मुंबई – राज्य सराकर केंद्र सरकला अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे त्यांच्या पाया पडायला तयार आहे. मात्र ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणले. याच बरोबर “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत” असंहि ते म्हणाले. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट केंद्र सरकारला विनवणी केली आहे.