जळगाव: कोरोना लसीबाबत समाजात अनेक संभ्रम आहेत. पण आम्ही घेतली आहे, तुम्ही पण घ्या… कोरोना लस पुर्णपणे सुरक्षितच असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतरही कोरोना लसीकरणाचे मोहिम संथगतीने सुरू आहे. नागरिकांमध्ये कोरोना लसीविषयी आजही अनेक संभ्रम आहेत. या संभ्रमाबाबत शासनाकडुन वेळोवेळी जनजागृतीही करण्यात आली आहे. तरी देखिल हवा तसा प्रतिसाद या मोहिमेला मिळतांना दिसून येत नाही. दरम्यान लसीकरणाच्या मोहिमेसाठी समाजातील नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेण्यासाठी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी कुटूंबियांसह स्वत:ही कोरोनाची लस आज टोचून घेतली. डॉ. उल्हास पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी पाटील, पत्नी तथा स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा पाटील यांनीही लस टोचुन घेतली.
कोरोनाची लस सुरक्षितच: डॉ. उल्हास पाटील
कोरोनासारख्या महामारीशी सगळ्यांनीच मुकाबला केला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थीती आता नियंत्रणात आली आहे. कोरोनाला पुर्णपणे हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लस टोचुन घेतली पाहिजे. कोरोनाची लस ही पुर्णत: सुरक्षित असुन त्याचा कुठलाही त्रास नाही. आज आमच्या परिवाराने ही लस टोचुन घेतली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या या मोहिमेत कुठलीही भिती न बाळगता सगळ्यांनी सहभागी होऊ लस टोचुन घ्यावी असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी केले आहे.