निगडी : महापालिका व पर्यावरण संवर्धन समितीतर्फे सिटी प्राईड स्कूलमधील 800 विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकचा वापर कमी करू’ अशी शपथ सामुदायिक घेतली. आता हे विद्यार्थी पर्यावरण दूत म्हणून शहरात प्रत्येकी शंभर लोकांना हा संदेश देतील. टाटा मोटर्स कंपनीचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पराळकर यांनी शपथ वाचन केले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, सिटी प्राईडच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, प्राचार्य माया सावंत, इसिए अध्यक्ष विकास पाटील, विनिता दाते, पुरुषोत्तम पिंपळे, सुर्यकांत मुठीयान, विलास कुटे, अरुण पाटोळे, आरोग्य विभाग एम. एम. शिंदे, प्रभाकर मेरुकर आणि इसिएचे स्वयंसेवक उपस्थित होते.