“आम्ही भरलेली थाळी दिली, तुम्ही रिकामी थाळी वाजवायला लावली”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला जोरदार शब्दात टोलविले

मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला.

कोरोना काळात राज्य सरकारने अथक परिश्रम घेतले, तरीही विरोधक सरकारवर टीका करत असतात. शिवभोजन योजनेच्या माध्यमांतून निरंतर सातत्याने जेवण दिले गेले. ‘कोरोना काळात आम्ही आम्ही भरलेली थाळी दिली, तुम्ही मात्र कोरोना घालविण्यासाठी रिकामी थाळी वाजवायला लावले’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोलविले.

वीर सावरकर यांना भारतरत्न देत नाहीत, गुजरातमधील स्टेडियमवरील सरदार पटेल यांचे नाव काढून टाकता, आणि आम्हाला हिंदुत्व शिकविता. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करूच असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.