आम्ही मानवतेच्या बाजूने, कोणीही दबाव टाकू शकत नाही: संजय राऊत

0

नवी दिल्ली:नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सुरुवातीला शिवसेनेने पाठींबा दर्शविला होता. मात्रनंतर पाठींबा दिला नाही. यावरून महाराष्ट्रातील सत्ता समीकरणामुळे शिवसेनेने कॉंग्रेसच्या दबावात येऊन आपली भूमिका बदलली असे आरोप झाले. दरम्यान यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेचे समीकरण वेगळे होते, राज्यसभेचे वेगळे आहेत. शिवसेनेवर कोणी दबाव टाकू शकत नाही. मानवतेच्या हिताचे आहे, त्यांची आम्ही बाजू घेणार असे संजय राऊत यांनी सांगितले.

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. सगळ्यात वाईट अवस्था नेपाळची आहे. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही संसदमध्ये मांडणार. जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, तर आम्ही त्यांना विरोध करणार. या देशाचे जे देशभक्त आहेत, त्यांना प्रमाणपत्राची गरज नाही असेही त्यांनी सांगितले.