आम्ही लाडू गृपचे सदस्य, आमचे कोणीच काही वाकडे करु शकत

0

धमकी देत तरुणांवर वीटांचा मारा : त्या चौघांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक आणखी

जळगाव : आम्ही लाडू गृपचे सदस्य आहोत, आमचे कोणीच काही वाकडे करु शकत असे म्हणत चौघांनी राहूल कांतीलाल सोनवणे (28, रा.आंबेडकर नगर) या तरुणाच्या डोक्यात 31 डिसेंबरच्या रात्री विटांचा मारा करुन जखमी केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, याच चौघांनी रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला केला होता. या गुन्ह्यात अटक करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यात त्यांना जामीन मिळल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी लगेच दुसर्‍या गुन्ह्यात अटक केली आहे.

न्यायालयीन कोठडी

रिक्षा चालक दीपक गंगाराम सोनवणे (40, रा.वाल्मिक नगर) याच्यावर चॉपर हल्ला झाल्यानंतर शनी पेठ पोलिसांनी आकाश मुरलीधर सपकाळे, गणेश रविंद्र सोनवणे, दीपक सुकलाल सोनवणे (तिघे रा.कांचननगर) व गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर) या चौघांना गुरुवारी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राहूल सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मित्र राहूल पंढरीनाथ साळुंखे असे दोघं घरकुल चौघात थांबलेले असताना आकाश, गणेश, दीपक व गणेश असे चौघं तेथे आले व ‘आम्ही लाडू गृपचे सदस्य आहोत, आमचे कोणीच काही वाकडे करु शकत नाही’ असे म्हणत राहूल सोनवणे याच्या डोक्यात, पाठीवर व मानेवर विटा मारल्या. त्यात राहूल जखमी झाला. यावेळी मुरलीधर सपकाळे व प्रतिभा सपकाळे भांडण सोडविण्यासाठी आले असता आकाश याने प्रतिभा सपकाळे यांनाही मारहाण केली. जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राहूल सोनवणे याने गुरुवारी शनी पेठ पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निराक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, परीस जाधव, संजय शेलार, नितीन बाविस्कर, अनिल कांबळे, राहूल पाटील,अमोल विसपुते, राहूल घेटे, किरण वानखेडे व मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने पुन्हा या चौघा संशयितांना ताब्यात घेतले.