आम विमा योजनेच्या पॉलिसी प्रस्ताव धुळ खात

0

पाचोरा । केंद्र व राज्य शासनाचे माध्यमातून गोरगरीब, भुमीहीन शेतमजुरांसाठी भारतीय जीवन र्विमा (एलआयसी) मार्फत आमविमा आदमींच्या नावाने पालिसी काढल्या जात असुन पाचोरा तालुक्यात सन 2008 मध्ये तालुक्याभरातुन 45 हजार नागरिकांच्या पालिसी उतरविण्यात आल्या होत्या. त्या पॉलिशी एल.आय.सी. विमा कंपनीकडुन गेल्या वर्षभरापासुन तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. मात्र संबंधित अधिकारी व कार्यालयांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित लाभार्थींचे प्रस्ताव संगायो विभागाकडे धुळ खात पडल्या आहेत.

लाभार्थीसाठी आहेत विविध योजना
केंद्र व राज्य सरकार 50-50 टक्के वाटा उचलून गोरगरीब शेतकर्‍यांसाठी ही आमआदमी विमा योजना एलआयसी मार्फत राबविते. या लाभार्थींचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसास 30 हजार रूपये, एक अवयव निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये व दोन अवयव निकामी झाल्यास 75 हजार रुपये अशीही योजना असुन तालुक्यातील 45 हजार नागरिकांनी विमा उतरिविला आहे. गेल्या 9 वर्षापूर्वी उतरविलेल्या विम्या संधर्भात अनेक लाभार्थींना विसरही पडला आहे. मात्र विमा उतरवुन दुरदैवाने लाभार्थींचे जीवनाचे बरे वाईट झाल्यास त्याचे वारसाकडे पालीसेचे प्रमाणपत्र नसल्याने त्यास लाभापासुन वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

आमर्विमा योजनेच्या पॉलिसीचे प्रमाणपत्र वर्षभरापासुन कार्यालयात प्राप्त झाले आहेत. संबंधित गावाच्या तलाठ्यांना अनेक वेळा प्रमाणपत्र घेऊन वाटप करण्याबाबत अनेकदा सांगण्यात आले. मात्र तलाठ्यांनी प्रमाणपत्र न नेल्याने कार्यालयात पडून आहे.
– नायब तहसिलदार ए.डी.बागुल