आयआयएमएसचा ‘इंडक्शन’ सोहळा उत्साहात

0

चिंचवड : येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये व्यवस्थापन शाखेच्या नवीन तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा अर्थात ‘इंडक्शन’ कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. या सोहळ्याचे उद्घाटन केहिन फाय कंपनीचे कार्यकारी संचालक सुधीर गोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. याप्रसंगी यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे, संजय छत्रे, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे रजिस्ट्रार विजय कुलकर्णी, जे. के. सहस्त्रबुद्धे यांच्यासह संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर गोगटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यातील निरीक्षण शक्ती वाढवून, एखादी गोष्ट समजून घेणे, योग्य कृतीची निवड करणे आणि वेगवेगळ्या घटनांमधून, परिस्थितीतून मिळालेला धडा लक्षात ठेवत त्यातून शिकत जाणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भाग्यश्री कुंटे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा शिंदे व दीपक लोणकर यांनी केले.