आयआयटी मुंबईत गाडगेबाबा अभियांत्रिकीचा डंका

0

रोबोवॉरमध्ये टीम गज सायबॉर्गची धमाल

भुसावळ- आय.आय.टी.मुंबई, पवईत 14 ते 16 डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या ‘टेकफेस्ट-18’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाच्या महोत्सवात यंदा श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम गज सायबॉर्गने दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेत टीमचा 60 किलो बॉट ‘बोस’ व ‘भगत’ यांनी दर्शकांची मने जिंकून दणदणीत विजय मिळवला. स्पर्धेत फायनल मॅच बोस विरुद्ध नामांकित टीम स्वॅग बरोबर झाली. यात टीम गज सायबोर्गचा रोबोट बोस विजयी झाला. या स्पर्धेत गज सायबॉर्गने रोबोवार्स या स्पर्धेत प्रथम व तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत अनेक नामांकित ब्राझील, इराण, रशियातील स्पर्धक सहभागी झाले होते.

यांचा टीममध्ये सहभाग
या टीममध्ये भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी पुष्पेंद्रसिंग पटेल, अविनाश बनसोडे, अक्षय भंगाळे, परेश पाटील, आतिश यादव, अनुज सारस्वत, जुड गावंडे, सौरभ मित्रा, तुषार बर्‍हाटे, शुभम सनांसे, शुभम साळुंखे, लोकेश मिश्रा व शुभम पवार आदींचा समावेश होता. यशस्वी टीमचे हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अकॅडमिक डीन डॉ.राहुल बारजिभे यांनी कौतुक केले. दरम्यान, महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा.ए.व्ही.पाटील, प्रा.जे.एस.चौधरी, प्रा.जी.सी.जाधव, प्रा.जी.एच.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम चांगली कामगिरी दाखवत आहे.