आयआयटी शिक्षणानंतर तरुणांनी सुरु केला हा भन्नाट उद्योग

0

लखनऊ: चार मित्रांनी आयआयटीच्या शिक्षणानंतर नोकरी न करता स्वत:चा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. चौघांनी मिळून चहा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. पारंपारिक पद्धतीने चहा न विकता आधुनिक पद्धतीने ग्राहकाला घरपोच चहा पोहोचविण्यासाठी एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांनी एक यंत्र तयार केले असून ग्राहकांकडून चहाची ऑर्डर मिळाल्यानंतर थेट घरपोच चहा पोहोचविली जाणार आहे. त्यांनी एक ड्रोन तयार केला आहे. यात चहा ठेवून थेट ग्राहकाकडे पोहोचविली जाणार आहे. ५ मीटरचे पंख असलेल्या या ड्रोन मध्ये दोन किलो पर्यंत अन्न दहा किलोमीटर पर्यंत पोहोचविता येणार आहे.