आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यांच्यासह पत्नी मुलाला जामीन !

0

नवी दिल्ली : आयआरसीटीसी टेंडर घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दल प्रमुख माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्याचे पुत्र तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून नियमित जामीन मिळाला आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने एक लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर या तिघांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 फेब्रुवारीला होणार आहे.

दरम्यान, आयआरसीटीसीची दोन हॉटेल्स खासगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या कंत्राटात झालेल्या कथित गैरव्यवहारांशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते.