‘आयएमए’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

भुसावळ । येथील सहकार नगर भागातील आयएमए सभागृहात आयएमएतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही सदस्य डॉक्टरांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. आयएमएचे ज्येष्ठ सभासद डॉ. संतोष चौधरी, डॉ. छाया व्ही. चौधरी, अध्यक्ष डॉ.दिपक जावळे, सचिव मिलींद पाटील, कोषाध्यक्ष प्रसन्ना जावळे यांच्या हस्ते गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन
मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देत उज्वल भविष्यासाठी अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन केले तर सत्कारार्थीतून रोहीत तुषार पाटील व अश्विन मिलींद धांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन डॉ. जान्हवी पाटील व डॉ. शितल चौधरी यांंनी केले. यावेळी आयएमए संघटनेचे 140 सभासद उपस्थित होते.