आयएमएने घातली नगराध्यक्षांकडे गळ

0

भुसावळ : नगरपालिका निवडणूकीत गटनेता निवडण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता स्विकृत नगरसेवक निवडीसाठी चुरस वाढली असून भाजपतर्फे स्विकृत सदस्य म्हणून शर्यतीत असलेले डॉ. नि.तु. पाटील यांची वर्णी लावण्यात यावी यासाठी आयएमएम या संघटनेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांना निवेदन देण्यात आले. आयएमएमतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या या चमूने त्यांना निवेदन दिले.

डॉक्टरांचाही प्रतिनिधी हवा
पालिकेत प्राध्यापक, वकिल, अभियंता प्रतिनिधी म्हणून आहेत. मात्र डॉक्टरांपैकी कुणीही नसल्याने डॉ. नि.तु. पाटील यांची स्विकृत सदस्यपदी नियुक्ती करण्याची मागणी आएमएमतर्फे करण्यात आली आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले की, पालिकेत 48 नगरसेवकांमध्ये कुणीही डॉक्टर व्यक्ती नाही तेव्हा डॉक्टरांच्या अडी अडचणी, सुचना त्यामार्फत सभागृहात मांडण्याच्या दृष्टीने आमचा एक प्रतिनिधी सभागृहात असावा त्यामुळे भाजपा वैद्यकिय आघाडी जिल्हा सदस्य डॉ. नि.तु. पाटील यांच्या नावाला पाठींबा देत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. निवेदनाच्या या प्रती आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे यांनाही देण्यात आल्या आहेत.