आयएमए जळगावच्या सचिवपदी डॉ राधेश्याम चौधरी

तर अध्यक्षपदी डॉ सी जी चौधरी यांची निवड

आयएमए जळगावच्या सचिवपदी डॉ राधेश्याम चौधरी तर अध्यक्षपदी डॉ सी जी चौधरी यांची निवड
आयएमए जळगावच्या सचिवपदी डॉ राधेश्याम चौधरी तर अध्यक्षपदी डॉ सी जी चौधरी यांची निवड मागे झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलेली आहे. दि १ एप्रिल २०२१ पासून हे दोघही पदाधिकारी कार्यभार सांभाळतील.
आयएमए जळगाव च्या नुतन अध्यक्षपदी शहरातील नामवंत जनरल सर्जन डॉ सी जी चौधरी यांची निवड झाली आहे. डॉ चौधरी हे कार्यरत असलेले सर्वात ज्येष्ठ सर्जन आहेत. नित्यसेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून ते १९८२ सालापासून रूग्णसेवा अव्याहतपणे  देत आहेत.
डॉ राधेश्याम चौधरी हे २००२ सालापासून शहरात स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ म्हणून रूग्णसेवा करित आहेत. आधी जिल्हा रूग्णालयात तर २००४ पासून ते सृष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्यरत आहेत. वैद्यकिय सेवेसोबत विविध सामाजिक उपक्रमातही डॉ राधेश्याम चौधरी हे सक्रियपणे सहभागी असतात. २००९ सालापासून ते आयएमए च्या कार्यकारी मंडळात जनसंपर्क अधिकारी,सहसचिव आदि जबाबदार्यांवर कार्यरत होते.
शहरातील वैद्यकिय व्यवसायिकांच्या समस्या सोडवून विविध वैद्यकिय व सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस या कार्यकाळात आहे.
– डॉ सी जी चौधरी, नुतन अध्यक्ष आयएमए जळगाव
अलिकडे डॉक्टर-रूग्ण संबंधात येत असलेला तणाव कमी करून हे नात अधिक विश्वासाच करण्यासाठी प्रयत्न करू. आयएमए चे सदस्य अर्थात डॉक्टर्स यांचा  प्रशासन व समाज या दोन्ही घटकांशी समन्वय वृद्धींगत करण्याच काम करू.
 – डॉ राधेश्याम चौधरी, नुतन सचिव आयएमए जळगाव.