‘आयएमए’ राज्य शाखेच्या सहसचिवपदी डॉ.पाटील

0

जळगाव । येथील बालरोग तज्ञ व आयएमएचे मानद सचिव डॉ.राजेश पाटील यांची आयएमएच्या राज्य शाखेच्या सहसचिवपदी निवड झाली आहे. नागपूर येथे 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या आयएमएची मास्टॉन 2017 या राज्यस्तरीय परिषदेत ही निवड करण्यात आली. या परिषदेत डॉ.वाय.एस.देशपांडे यांच्याकडे डॉ.अशोक तांबे यांनी अध्यक्षपदाचा पदभार सोपविला. डॉ.पार्थिव संघवी हे सचिव पदी कायम असून चार सहसचिव पदापैकी एक पद प्रथमच जळगाव आयएमएला प्राप्त झाले आहे.

40 हजार पेक्षा जास्त सदस्य
राज्यात आयएमएचे 40 हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. डॉ.राजेश पाटील यांचा या परिषदेत ‘प्रेसिडेंटस् ऍप्रिसीऐशन ऍवार्ड फॉर सेल्फलेस सर्व्हीस’ या राज्यस्तरीय पुरस्काराने देखील गौरव करण्यात आला. डॉ.पाटील जळगाव मनपामध्ये स्वीकृत नगरसेवक असून रोटरी वेस्ट व मराठा मंगलच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या या दुहेरी सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.