आयएसआय एजंटांकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश

0

मुंबई । महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त कारवाईत मुंबईतून दोन आयएसआय एजंटच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. या एजंटच्या अटकेमुळे भारतातील सर्वात मोठ्या हवाला सेलचा पर्दाफाश झाला आहे. इंडियन मुजाहीदीन या दहशतवादी संघटनेला हवाला मार्फत पैसे पुरवण्यात अटक करण्यात आलेले आयएसआय एजंट जावेद आणि अल्ताफचा हात असल्याचा खुलासा तपास यंत्रणांनी केला.

फेब्रुवारी 2007 ते मार्च 2014 पर्यंत देशात झालेल्या प्रमुख बॉम्ब स्फोटांमागे या दोघांनीच आर्थिक पाठबळ दिल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातून जावेद आणि अल्ताफला अटक झाल्याने दहशतवादी संघटनेचा कणा मोडल्याचं तपास यंत्रणांकडून सांगितलं जात आहे. तसंच ऑपेरा हाऊस, झव्हेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडवणारा इंडियन मुजाहिदीनचा मास्टरमाईंड यासिन भटकळला जावेद आणि अल्ताफ यांनीच मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जावेद आणि अल्ताफचा आणखी कोणकोणत्या बॉम्बस्फोटात हात असल्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे, याची एक यादी बनवण्यात आली आहे.

यातही सहभागाची शक्यता
2007मध्ये देशातील दोन बॉम्बस्फोट
2008मध्ये देशातील पाच बॉम्बस्फोट
2010मध्ये देशातील दोन बॉम्बस्फोट
2011मध्ये मुंबई, दिल्लीतील दोन बॉम्बस्फोट
2012सालचा पुण्यातील बॉम्बस्फोट
2013मधील हैदराबाद, बंगळुरू येथील बॉम्बस्फोट
2014मधील चेन्नई आणि बंगळुरू येथील बॉम्बस्फोट