हडपसर । वडकी येथील श्री विघ्नेश्वरा एज्युकेशन सोसायटी संचलित इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट अॅन्ड रिसर्च या व्यवस्थापन महाविद्यालयात गुरुवारी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर नवीन मुलांचे स्वागत प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाने होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलाने झाली. आलेल्या नवीन मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान टाइम्सचे उपाध्यक्ष विजय सिंह, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या संस्थेच्या अध्यक्षा मंजिरी गोखले उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयकिसन भुतडा, व्यवस्थापकीय संचालक डॉ.नीलेश भुतडा, सल्लागार मेजर जनरल (नि) अमर कृष्णा, संचालिका डॉ.मंजू पुनिया चोप्रा, विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक सेठ आणि आनंदिता आचार्य या विद्यार्थांनी केले. तर डॉ.निलेश भुतडा यांनी आभार मानले.
उच्चशिक्षण संचालक धनराज माने यांच्या निलंबनासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वत: माने यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, 30 ते 35 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.