हडपसर । इंडियन ओसिनिक पार्टी (आयओपी) ची महाराष्ट्र कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा प्रदेश अध्यक्षपदी संजय सावंत पाटील, पुणे शहर व्यापारी अध्यक्षपदी बाळासाहेब दाते आणि पुणे शहर सचिवपदी मारूती कुमठेकर यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आय.ए.एस अधिकारी सी. पी. व्यास यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश कुमार यादव, राष्ट्रीय सचिव संतोष पाटील, राष्ट्रीय युवा सचिव प्रशांत जाधव उपस्थित होते. यावेळी अहमदनगरमधील नगर तालुका व्यापारी अध्यक्ष पदी राजाराम वाघ, जावळी तालुका युवा अध्यक्षपदी गिरीश भिसे यांची नियुक्ती करण्यात आली.