आयकर विभागाकडून प्रभाकर चव्हाणसह इतर 300 जणांवर गुन्हा दाखल

1

शिरपूर । गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह धुळे जिल्ह्यात आयकर विभागाची छापेमारी सुरू असून दरम्यान आज शिरपूर येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्यासह 300 हुन अधिक लोकांनी चौकशीत अडथळा निर्माण केल्यामुळे आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. अमरीश पटेल यांच्या निवस्थानावर आणि डीसान कंपनीत भागीदार असलेल्या शिरपूर शहरातील भागीदारांच्या निवस्थानी गेल्या 2 दिवसापासून चौकशी सुरू आहे. दरम्यान आज तिसरा दिवस असून डीसान कम्पनी व प्रियदर्शनी पतपेढी आदी ठिकाणचे काही लॉकर सील करण्यात आले आहेत. सहाय्यक आयकर आयुक्त महेश दत्तात्रय लोढे  यांच्या फिर्यादीवरून शासकिय कामात आळथळा आणल्या प्रकरणी प्रभाकर तुकाराम चव्हाण यांच्यासह इतर ३०० ते ४०० जणावंर शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.