धुळे । माजी मंत्री व विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल आणि जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह 10 जणांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळपासून सुरु असलेली आयकर विभागाची तपासणी दुसर्या दिवशी गुरुवारीही चौकशी सुरू आहे. रात्री पथकाचे काही अधिकारी निवासस्थानीच थांबले तर काही हॉटेलमध्ये मुक्काम करणे पसंत केले.