आयटकतर्फे जि.प.समोर रास्तारोको

0
जळगाव- शहरातील जिल्हा परिषद समोरील पत्र्या हनुमान चौकात आयटक संघटनेतर्फे शुक्रवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बंद करा, बंद करा, जिल्हा परिषद सीईओचा पगार बंद करा अशा घोषणा देत आयटकतर्फे रास्तारोको करण्यात आले. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पगाराची थकीत रक्कम देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सर्वांना समजावून सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.