औंध । औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार संधी मिळावी, यासाठी चार कंपन्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान शिकायला मिळणार आहे. आयटीआयमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ. विजय काळे उपस्थित होते.
काळेे म्हणाले, बदलत्या काळानुरूप व नव्या उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान असेलेले प्रशिक्षण घेता यावे, यासाठी मॅकेट्रोनिक्स आणि रोबोटिक्स हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. खासगी संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम 25 ते 30 हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. मात्र औंध आयटीआयमध्ये हे अभ्यासक्रम केवळ दोन हजार रुपयांमध्ये शिकविले जातात. संस्थेने पिंपरी येथील टाटा मोटर्स, दापोडी येथील सँडविक एशिया लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया आणि सॅमसंग इंडिया यांच्याबरोबर करार केले आहेत.