आयटीआयच्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी

0

पनवेल । पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नियोजित इमारतीला आज मुहूर्तस्वरूप देण्यात आले. सुसज्ज आणि सर्वांगसुंदर इमारतीचा आराखडा मंजूर करण्यात आला. आयटीआय पूनर्विकास समितीची आढावा बैठक कौशल्य, विकास विभागाचे राज्य संचालक अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथे संपन्न झाली. त्यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नव्या इमारतीसह वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे.

विश्रामगृह, कँटीन, स्टाफ रूम, लिफ्टची व्यवस्था, चार माजली इमारत आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. अडीच हजार विद्यार्थ्यांना सामावून घेणारी अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. या बैठकीस समितीचे सचिव, प्राचार्य बी. व्ही. फडतरे, सदस्य कांतीलाल कडू, माधुरी गोसावी, पराग बालड, अभियंता एस. एम. कांबळे, ज्योती लोहार, माधुरी शिंदे, एस. जे. पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवाड, अँड. संतोष सरगर, शैलेश चौधरी, अमित चावले, मनहर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.