आयटीआयसाठी तीनशे बेंचेसची खरेदी

0

पिंपरी : महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील आयटीआयसाठी तीनशे बेंचेस खरेदी करण्यात येणार आहेत. सव्वाचार हजार रुपयांचा एक बेंच असून सुमारे साडेबारा लाख रुपये इतका खर्च बेंचेस खरेदीसाठी येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मोरवाडी आणि कासारवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहे. त्याठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्याथ्रयांसाठी बेंचेस खरेदी करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागविण्यात आली होती. त्यावर मेसर्स रेखा इंजिनिअरींग वर्कस, मेसर्स सिद्धविनायक एंटरप्राईजेस, मेसर्स शिवसमर्थ एंटरप्राइजेस या तीन कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या.

त्यातील रेखा इंजिनिअरींग वर्कस यांनी अन्य दोन कंपन्यांपेक्षा 1.74 टक्के कमी दराने निविदा सादर केली. महापालिकेच्या आयटीआयला आवश्यक तीनशे नग बेंचेस त्यांनी प्रति 4 हजार 225 रुपये प्रमाणे देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे रेखा इंजिनिअरींग वर्कसकडून बेंचेस खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी एकूण 12 लाख 67 हजार 500 रुपये इतका खर्च येणार आहे. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.