जळगाव : शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था मुलींची व मुलांच्या संस्थेत कौशल्य वृध्दीसाठी दोन दिवसीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या तंत्र प्रदर्शनाची सांगता अप्पर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या उपस्थितीत मुलींची शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे झाली. यावेळी विद्यार्थ्यानी तयार केलेल्या विविध कलाकृतींची पाहणी पाटील यांनी केली. विद्यार्थीनींनी स्वत तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थ, विविध प्रकारच्या शोभेच्या आणि सजावटीच्या वस्तू, प्रदर्शनात सादर केल्या. विद्यार्थ्यानींनी प्रदर्शनात मांडलेल्या विविध कलाकुसरींचे कौतुक यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. विद्यार्थीनींनी तयार केलेली वस्तु भेट म्हणून त्यांना देण्यात आले. तंत्र प्रदर्शन समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
विद्यार्थींनीना केले मार्गदर्शन
यावेळी शुक्रवारी 16 रोजी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत तंत्रप्रदर्शनाला सुरुवात झाली होती. समारोप प्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सोमेश्वर वाघमारे, प्राचार्य आर.एम.डांगे, सहसंचालक सतिष सुर्यवंशी आदी उपस्थित होते. शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या तंत्र प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी विद्यार्थीनींनी स्वतःचे रक्षण करण्याचे शिका, तुम्हाल कोणी छळत असेल किंवा कोणत्याही व्यक्तींकडून तुम्हाला त्रास होत असेल तर ह्या गोष्टी आपल्या स्वकीयांना कळवून वेळीच खबरदार घ्यावे असे मार्गदर्शन केले.