जळगाव : माध्यमिक शालांत परीक्षा दहावीचा निकाल 8 जून रोजी जाहीर झाला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रकियेयसाठी ऑनलाईन अर्ज केले जातात. आयटीआय प्रवेश अर्जाची प्रकिया 3 पासून सुरु झाली असून 30 जून पर्यंत आहे. मात्र संकेतस्थळावर अर्ज भरतांना सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुदतीत अर्ज न सादर झाल्यास शैक्षणिक नुकसानाची भिती व्यक्त असून प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे आहेत. पर्यायी व्यवस्था अथवा मुदत वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
सायबर कॅफेवर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी
आयटीआय प्रवेशासाठीचा अर्ज ’डिव्हीइटी’ या सरकारी संकेतस्थळावरून ऑनलाईनच भरावयाचा आहे. यासाठी शहरातील विविध सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांसह पालकांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडत आहे. त्यातच अर्ज करतांना सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्यात असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागत असून 12 तासातसही अर्ज भरल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. सायंकाळी व तसेच पहाटे सर्व्हर सुरळीत असल्याने याचवेळी गर्दी होते. काही केंद्रावर काही विद्यार्थी रात्रभर जागरण करून आपला प्रवेश प्रकियेचा अर्ज करत भरत असल्याचे चित्र आहे.
मुदत वाढविण्याची मागणी
दिवसभर थांबूनही अर्ज भरल्या जात नसल्याने कागदपत्रे सायबर कॅफेवरच ठेवूनच जात आहेत. अर्ज सादर करण्याची 30 जूनपर्यंत शेवटची मुदत आहे. या वेळेत सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज सादर करणे अशक्य असल्याने प्रवेश तसेच अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून होत आहे. अथवा संकेतस्थळावरील सर्व्हरच्या खोळंब्यावर पर्यायी व्यवस्था करावीही अशीही मागणी होत आहे.
विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण 864 जागा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण 864 जागा आहेत. यात इलेक्ट्रिशिअन, फिटर, टर्नर या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असून यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात मेरीटनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
एक वर्षाचा अभ्यास क्रम
अभ्यासक्रम जागा
सुतारकाम 24
फॉन्डीमॅन 20
ट्रक्टर मेकनिक 20
पी.ओ.सि.एम 20
वेल्डर 80
मेकेनिक डीझेल 40
कोपा 48
पी.पी.ओ 40
दोन वर्षाचा अभ्यासक्रम
मशिनिष्ट 80
ग्राइंदर 48
फीटर 80
टर्नर 48
इलेक्ट्रीशियन 80