आयटीआय प्रवेशाच्या जागा वाढवणार

0

मुंबई । औद्योगिक विकास प्रशिक्षण केंद्र आयटीआयच्या संपूर्ण राज्यात 1 लाख 34 हजार जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आली. मात्र, आयटीआयसाठी प्रवेश घेणार्‍याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात घेऊन आगामी काळात यात वाढ करण्यात येणार असून 2 लाख जागेवर प्रवेश देण्यात येईल आहे, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्‍नोत्तरावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. संपूर्ण राज्यात शासकीय आयटीआय प्रवेशासाठी संपूर्ण राज्यात एकदाच प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या जिल्ह्यात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते ज्या जिल्ह्यातील असतील त्याच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यानंतर आयटीआय प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना ते ज्या जिल्ह्यातील असतील त्याच जिल्ह्यात त्यांना प्रवेश दिले जाईल, असे आश्‍वासन निलंगेकर यांनी दिले. राज्यात आयटीआयच्या 22 हजार 28 जागा रिक्त आहेत. त्याजागा भरण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यात आली असून त्यास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्यांबाबत डिसेंबर 2017 मध्ये कौशल्य विकासमंत्री व मुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत आयटीआयतील मागण्यांसंदर्भात कार्यवाहीचे निर्देश दिले.