आयटीतील जॉब सोडूनही 100 करोडची उलाढाल !

0

कॅनडा : आयटी कंपनीत काम मिळण्यासाठी तरुण जीवाच रान करतात अशी नोकरी सोडून रॉड्रीक्स यांनी कॉम्प्यूटर पार्ट्स विकण्याची उलाढाल सुरु केली. आता अडचण अशी होती की या व्यवसायातील त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या बायको आणि सासूला कसे समजवायचे हे आव्हान होते. त्यामुळे 2001 मध्ये त्यांनी नोकरी थांबवून पूर्णवेळ व्यवसाय करण्याचे मनाशी पक्के केले. आपल्या स्वप्नांच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल होते. मी जे काही बनवेन ते मला आवडले पाहिजे असे त्यांचे टार्गेट होते. काय घडतय ते माहित नव्हते पण स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्याच निश्चित केल होते. काही महिने वेड्यासारख संशोधन केल्यावर एक आयडीया त्यांच्या मनात आली. मोबाईल फोन्स आणि लॅपटॉप कंट्रोल करु शकेल अशी सॉफ्टवेअर सिस्टीम बनवायचे ठरले.

कंपनीला सोटी असे नाव दिले गेले. काम खुपच शांत गतीने सुरु होते. 12 महिन्यानंतर रॉड्रीक्स यांना युकेतील मोठ्या सुपरमार्केट ग्रुपमधून फोन आला. त्या फर्मला ग्राहकांना कॉम्युटर सिस्टीम विकायची नव्हती. रॉड्रीक्स यांचे वय सध्या 55 असून ते सोटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जेव्हा युकेतून फोन आला तेव्हा ते त्यांच्या तळघरात बसले होते. युकेच्या फर्मने 20 हजार युनिट्सची मागणी केली होती. त्यानंतर ‘सोटी’ ने मागे वळून पाहिले नाही. खुप लोकांनी या कंपनीचे नाव ऐकले नव्हते कारण मोबाईल टेक्नोलॉजी सिस्टीम ग्राहकांना देण्याऐवजी ते थेट कंपन्यांनाच देत असत. 2006मध्ये त्यांना मायक्रोसॉफ्टमधून फोन आला. कॅनेडीअन बिझनेसमॅनला सोटीकडून जेवढे शक्य होईल तेवढी मदत घ्यायची होती. पाकिस्तानात जन्मलेल्या रॉड्रीक्स यांचे पूर्वज गोव्यातील पोर्तूगल कॉलनीत राहायचे. ते 11 वर्षाचे असताना नातेवाईक आणि पालकांसोबत कॅनडात स्थायिक झाले. तळघरापासून व्यवसायाला सुरुवात करणार्‍या रॉड्रीक्स यांचे टॉराँटो आणि कॅनडाच्या बॉर्डरला मिसिसॉगा येथे येथे दोन बिल्डींगमध्ये हेडक्वॉटर आहे. आजुबाजुच्या लोकांनी कितीही वेड्यात काढल तरी आपण आपल्या निश्चयावर ठाम असू तर काहीही अशक्य नाही हे रॉड़्रीक्स यांनी दाखवून दिले आहे.