श्रीनगर-आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने एका जवानाचा मृत्यू झाला आहे तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जम्मू- श्रीनगर महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील खूनी नाला येथे हा अपघात झाला. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले असून या बसमधून ३५ जण प्रवास करत होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.