आयटीयन्सचा कॅण्डल मार्च

0

पिंपरी : आयटीक्षेत्रातील नोकरीचा भरवसा नसल्याने गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद या आयटी अभियंत्यांने नुकतीच पुण्यात आत्महत्या केली. या क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये अस्ाुरक्षिततेची भावना प्रबळ झाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयटीतील कर्मचार्‍यांनी हिंजवडीत विप्रो कंपनीजवळ कॅण्डल मार्च काढला.

त्यात हिंजवडीतील अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आयटी क्षेत्रात खळबळ माजवणार्‍या या घटनेचा अभियंत्यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. कामाच्या अनिश्चिततेतून आयटी क्षेत्रात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्चशिक्षित अभियंत्यांकडून कंपनी व्यवस्थापन जास्तीचे काम करवून घेत आहे व त्या कामासाठी दबावतंत्र अवलंबले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आयटीयन्सचे कामाचे तास निश्चित करून द्यावे. तसेच कामाचा व्याप कमी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.