घाटकोपर (निलेश मोरे)। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्री गणेश यांचे आगमन अवघ्या चार दिवसांवर आले आहे. महाराष्ट्रात सर्वत्र गणेश भक्तांची गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. घरोघरी सजावटीचे देखावे बनवण्याचे काम जोरात आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या प्रयत्नांना आता सुशिक्षित तरुणांची देखील जोड मिळताना दिसत आहे. घाटकोपरच्या आयटी इंजिनिअरचे विद्यार्थी असलेले सिद्धेश चव्हाण व अनिकेत खराडे यांनी ईको बाप्पा नावाचे अँड्रॉईड एप्लिकेशन बनवले असून स्वप्नील पिसाळ, संदेश भेके, अमोल फदाले, गुरुनाथ सामंत, मंगेश धनावडे, प्रतीक वरपे, चिंतामणी कांबळी, रोहन भांडे, यांनी या एप्लिकेशनसाठी माहिती संकलित केली आहे.
2007 सालापासून सुरू होते वेबसाइटवर काम
आयटी इंजिनिअर असलेले सिद्धेश चव्हाण व अनिकेत खाडे व त्यांच्या सर्व मित्रांनी 2007 पासून ईको फ्रेंडली गणेशोत्सवाची संकल्पना सुरु केली. गणेशोत्सवात पाण्यातील प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी संजय भुस्कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. 2007 पासून आम्ही एकूण 27 विद्यार्थी मित्रांनी घरोघरी ईको बाप्पाची मूर्ती बसवायला सुरु केली. त्यानंतर आम्ही एक बाप्पाची ब्लॉकसाईड सुरु करायचे ठरवले. या ब्लॉकद्वारे आम्ही ईको फ्रेंडली गणेश मूर्तीची पूजा, आरती कशी करावी व त्याच विसर्जन कशा पद्धतीने करावे हि संपूर्ण माहिती आम्ही फोटो व व्हिडियोसह या ब्लॉकवर टाकायला सुरुवात केल्याचे सिद्धेशने सांगितले. या ब्लॉकला लाखोंच्या वर जस जसे पसंती मिळत गेली.
इको बाप्पाबाबत माहिती
2013 साली 33,600 लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली, 2014 साली 1,14,479, 2015 साली 1,24,035, 2016 साली 1,53,000 तर या वर्षी 2017 गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच 8 लाख गणेश भक्तांनी या संकेतस्थळाला भेट दिली असल्याचे चव्हाण याने सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नाने ईको फ्रेंडली गणपतीची माहिती देणारे ईको बाप्पा नावाचे अँड्रॉईड एप्लिकेशन गणेश भक्तांसाठी मोफत उपलब्ध आहे.