आयडब्ल्यूएलसाठी सहा संघ

0

मुंबई । इंडियन वुमन्स लीगच्या महाराष्ट्र विभागीय लढतींमध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. पात्रता फेरीचे सामने 14 ऑगस्टपासून कुपरेज मैदानावर खेळवण्यात येतील.

या लढतींमध्ये फुटबॉल लीडर्स अकादमी, बॉडीलाईन फुटबॉल क्लब, केंकरे फुटबॉल क्लब, पीआयएफए स्पोर्ट्स क्लब, फुटबॉल स्कुल ऑफ इंडिया आणि रश सॉकर या संघाचा समावेश आहे. पात्रता फेरीतील सामने दोन टप्प्यांमध्ये खेळवण्यात येतील. या लढतींमधील विजेत्या संघाला इंडियन वुमन्स लीगमध्ेये थेट प्रवेश दिला जाणार आहे.