आयन एक्स्चेंजतर्फे अ‍ॅण्डिकॉस वेस्ट टू एनर्जी यंत्रणा

0

ठाणे । आयन एक्स्चेंज, इंडिया या जल व पर्यावरण व्यवस्थापनामधील आघाडीच्या कंपनीने हैद्राबादमधील तेलंगणा येथे भारताची पहिली अ‍ॅण्डिकॉस वेस्ट टू एनर्जी यंत्रणा दाखल केली आहे. अ‍ॅण्डिकॉस हा बेल्जियम येथे मुख्यालय असलेले विटो व युरोपेम यांच्या सहयोगाने आयन एक्स्चेंजचा संयुक्त प्रकल्प आहे. अ‍ॅण्डिकॉसच्या डिझाईनमध्ये इंडीऑन आयपीसी एमबीआर व इंडीऑन ऍडव्हान्स बायो-मिथेनेशन प्रक्रिया सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. इंडीऑन आयपीसी एमबीआर सांडपाण्याचे निर्जंतुकीकरण करत शुद्ध पाण्याची निर्मिती करते, जे पुन्हा वापरता येऊ शकते. इंडीऑन आयपीसी एमबीआर प्रक्रियेमध्ये तयार झालेला गाळ घर व समाजामध्ये आणि इंडीऑन ऍडव्हान्स बायो-मिथेनेशन प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या केंद्रीय सिंचन कचार्‍यासोबत एकत्र होतो. म्हणूनच अ‍ॅण्डिकॉस यंत्रणेमध्ये ओल्या व सुक्या कचर्‍यामधून शुद्ध पाणी, नवीकरणीय ऊर्जा व सेंद्रीय खत प्राप्त होते.

जगभरातील प्रगत तंत्रज्ञानावर आधारित
अ‍ॅण्डिकॉस वेस्ट टू एनर्जी यंत्रणा केंद्रीयकृत व अकेंद्रीयकृत वापरासाठी योग्यरीत्या निर्माण करता येऊ शकते. पहिली अ‍ॅण्डिकॉस वेस्ट टू एनर्जी यंत्रणा हैद्राबादमधील अक्षयपात्र येथे उभारण्यात आली आहे. अक्षयपात्र येथील नवीन व पूर्णपणे ऑटोमेटेड किचनमधून बाहेर पडणा-या सांडपाणी व सेंद्रीय कच-यावर प्रक्रिया केली जाते. अ‍ॅण्डिकॉस वेस्ट टू एनर्जी यंत्रणेमध्ये दररोज जवळपास 1000 किग्रॅ सेंद्रीय किचन कचरा आणि 2-6 मी सांडपाण्याच्या गाळावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. ही यंत्रणा दररोज जवळपास 20 किलोवॅट/तास वीजनिर्मितीसोबतच 1.35 टन सेंद्रीय खताची निर्मिती करेल. आयन एक्स्चेंज (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा म्हणाले,50 वर्षांहून अधिक काळापासून आयन एक्स्चेंज जल व कचरा व्यवस्थापन सोल्यूशन्समध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करत आलेली आहे. आम्ही दोन वर्षांपासून अ‍ॅण्डिकॉस यंत्रणा व तंत्रज्ञानाबाबत संशोधन करत ती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची सर्व सोल्यूशन्स व यंत्रणा जगभरात उपलब्ध असलेल्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे.