आयपीएलमधून बाहेर असून विराटची जादू कायम

0

नवी दिल्ली। भारत व आरसीबीचा कर्णधार विराट कोहली जरी आयपीएल 10 सिझनमध्ये खेळत नसला तरी तो आज ही सोशल मिडयावर नंबर एक स्थानावर कायम आहे.सोशल मिडियाच्या फेसबुक व इंस्टाग्राम यावर त्यावर विराटचे जादू पाहण्यास मिळत आहे. या साईडसवर फॉलोवर्स ट्वेंटी -20 लींगमध्ये सर्वात अधिक प्रसिध्दी झोतात असलेला खेळाडू विराट झाला आहे.विराट ज्याप्रमाणे आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडतो त्याचप्रमाणे सध्या त्याच्यावर चाहत्यांचा पाऊस पडत आहे. जरी धावा काढत नसला तरी चाहत्यांचे चांगले सर्वाधिक समर्थन त्याला मिळत आहे. त्याच जोरावर तो आयपीएलमधील सर्व खेळाडूमध्ये सोशल मिडियामध्ये नंबरवन झाला आहे.

महेंद्रसिंह धोनी दुसर्‍यास्थानावर
इडियन प्रीमियर लीगच्या 10 सिझनला सुरवात झाली आहे. मात्र चाहत्यामध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे.चाहते आपल्या आवडत्या खेळाडू व संघाबरोबर सोशल साईटवर जुळलेले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल साईटवर आयपीएल सर्वात अधिक चर्चेत राहिला खेळाडू आहे तो बैगळुरूचा कर्णधार विराट कोहली. तर फेसबुकवर पुणे संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुसर्‍या स्थानावर , हैदराबादचा युवराज सिंह तीसर्‍या स्थानावर , मुंबई संघाचा रोहित शर्मा चौथ्याक्रमांपकावर, कोलकत्ता संघाचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर, बैगळुरूचा क्रिस गेल सहाव्या स्थानावर, हैदराबादचा शिखर धवन सातव्या स्थानावर, कोलकत्ता संघाचा गौतम गंभीर आठव्या स्थानावर,मुंबई संघाचा हरभजन सिंह नवव्या स्थानावर, पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल दहाव्या स्थानावर आहे.