चंचलाताई कोद्रे क्रीडांगणाचे भूमीपूजन
हडपसर : स्वर्गीय चंचलाताई कोद्रे यांनी महापौर पदाच्या काळात पुण्यामध्ये संपूर्ण विकास कामाचे राजकारण केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोद्रे कुटुंबीयांनी विकास कामांचा वारसा जपला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेट जगतात मोठ्या संधी खेळाडूंना उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुंढवा येथे स्वर्गीय चंचलाताई कोद्रे क्रिडांगणाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक कैलास कोद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, माजी महापौर प्रशांत जगताप, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, योगेश ससाणे, नगरसेविका पूजा कोद्रे, हेमलता मगर, सुनील बनकर, नंदा लोणकर, डॉ.शंतनू जगदाळे, सागरराजे भोसले, अतुल तरावडे, यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सृजन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
यावेळी सृजन क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. सृजन क्रिकेट स्पर्धेस भारतीय टीम मधील माजी खेळाडू गौतम गंभीर याने भेट देऊन खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम केले.