आयपीएल प्रसारणाचे सर्व हक्क ‘स्टार’ला

0

मुंबई : बीसीसीआय आयोजित करत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 2018 ते 2022 या पाच वर्षासाठीचे प्रसारणाचे हक्क ‘स्टार’ला मिळाले आहेत.

स्टार इंडियाने सर्वाधिक 16,347.50 कोटींची बोली लावत आयपीएल सामन्याच्या प्रसारणाचे हक्क मिळविले असून, पुढील पाच वर्षासाठी स्टारकडे आयपीएलच्या सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. हे हक्क मिळविण्यासाठी स्टार इंडिया आणि सोनी पिक्चर्समध्ये चुरस लागली होती. या लिलावातून बोर्डाला 16 हजार कोटी मिळाले आहेत. आयपीएलच्या डिजिटल हक्कासाठी टाइम्स इंटरनेट, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि फेसबूक दावेदार होते.