‘आयपीएल- 10’चा किंग रायझिंग ‘पुणे’च होणार!

0

मुंबई । आयपीएलच्या या सत्रात दमदार असलेल्या मुंबई इंडियन्सवर अगदी सहज विजय मिळवीत पुण्याने फायनल गाठले आहे. हा पुण्याचा संघच यंदाच्या आयपीएलचा किंग होणार असल्याचा दावा क्रीडा अभ्यासकांनी केला आहे. मुंबईला एलेमिनेटरमधील विजेत्या संघाशी लढण्याचा एक ’मौका’ आहे. तो मौका जिंकत मुंबई फायनलमध्ये येईल, असे देखील चित्र आहे. पुण्यासोबत दुसरा योगायोग असा की, आयपीएलला सुरुवात झाल्यापासून नऊ वेळा गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे.

फक्त एकवेळा 2016 च्या स्पर्धेत तिसर्‍या स्थानावर असणार्‍या हैदराबादने विजेतेपद जिंकले आहे. जर या योगायोगावर विश्वास ठेवला तर पुणे सुपरजाएंटच यंदाचा किंग होणार आहे. पुण्याने मुंबईवर अगदी सहज विजय मिळवीत फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. या सामन्यात विशेष गोष्ट अशी की, अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी यांचा फॉर्म वापस अगदी वेळेवर वापस आला आहे. त्याचबरोबर पुण्याची गोलंदाजी देखील जोरदार होत असल्याने पुण्याला यंदाच्या आयपीएलचा दावेदार मानले जात आहे.