आयपीएल 10 मध्ये अनेक विक्रम होणार ! झेलांची

0

नवी दिल्ली । आयपीएल 10 मध्ये अनेक विक्रम होण्याची संधी नामवंत खेळाडूंना आहे.त्यामध्ये सर्वाधिक आघाडीवर वेस्ट इंडिज व बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा फलंदाज क्रिस गेल याला सर्वात मोठी संधी आहे.त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 9937 धावा केल्या आहे. दहाव्या सत्रातील त्याला 10 हजार धावा करून विक्रम करण्याची संधी आहे त्यासाठी 63 धावांची आवश्यकता आहे.10 हजार धावा पुर्ण करणारा ते जगातील पहिला खेळाडू ठरणार आहे. बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स टीमचा स्पर्धेतील पहिला सामना 8 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर होणार आहे. यात झंझावाती खेळी करून दहा हजार धावा पूर्ण करण्याचा गेलचा प्रयत्न असेल.

धोनीचे 118 झेल
श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या 123 झेलच्या विक्रमाला गाठण्याची संधी आहे. त्याला सहा झेलची गरज आहे.रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत 118 झेल घेतले आहेत.

200 झेलची पोलार्डला संधी
पोलार्डने टी-20 मध्ये आतापर्यंत 196 झेल घेतले आहेत. 200 चा आकडा गाठण्यासाठी त्याला चार झेलची गरज आहे. हे झेल घेतल्यानंतर अशी कामगिरी करणारा पोलार्ड हा पहिला क्षेत्ररक्षक ठरेल.

पोलार्ड होणार सात हजारी
मुंबई इंडियन्सचा केरोन पोलार्ड टी-20 च्या करिअरमध्ये 7 हजार धावांचा पल्ला गाठू शकतो. यातून त्याला विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. कारण शतकाविना 7 हजार धावा पूर्ण करणारा केरोन पोलार्ड हा पहिला क्रिकेटपटू ठरू शकतो.