मायक्रोसॉफ्टमधील ‘त्या’ कर्मचार्यामुळे सध्या जगभरात आयफोन पाहायला मिळत आहे. मायक्रोसॉफ्टमधील स्टीव्ह जॉब्स यांना खूप क्रोध यायचा. त्यांच्या या क्रोधातून आयफोनची निर्मिती झाली. या गोष्टीचा खुलासा ‘अॅप्पल’कंपनीचे माजी आयओएस अध्यक्ष स्कॉट फोरस्टॉल यांनी मुलाखतीच्या दरम्यान केला आहे. त्यांनी म्हटले की, स्टीव जॉब्स यांची जेव्हा जेव्हा माइक्रोसॉफ्टमधील ‘त्या’ कर्मचार्याशी भेट व्हायची, तेव्हा ते अत्यंत क्रोधाने परतायचे. जेव्हा जॉब्स यांनी अनेकदा त्या कर्मचार्याला डिनरसाठी विचारले, तेव्हा त्या कर्मचार्याने चक्क सलग 10 वेळा आपण कामात व्यस्त आहे, असे कारण देत निमंत्रण नाकारले. त्यावेळी माइक्रोसॉफ्ट कंपनी आपली स्टाइलिश काम्प्युटर आणि सॉफ्टवेअरची दुनिया बदलण्याच्या प्रयत्नात होती आणि अॅप्पल कंपनीला अजून परवानाही मिळायचा बाकी होता. त्यावेळी स्टीव्ह जॉब्स चिडला आणि ‘टॅब कसा असतो, हे आपण जगाला दाखवून देऊ’ असे म्हटले. त्यानंतर स्टीव जॉब्सने एप्पलची स्थापना केली. त्यानंतर अॅप्पलने पहिला टच स्क्रीन टॅब बनवला. पुढे जॉब्सच्या डोक्यात मल्टिपर्पज आयफोनची कल्पना आली.