आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिगचे महापौरांच्या हस्ते उदघाटन 

0
पिंपरी- आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिग-4 चे निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदान येथे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते उदघाचन झाले.
मागील ३ वर्षाच्या यशस्वी नियोजना नंतर २०१९ च्या पर्व ४ चे  आयबीसी प्रिमियर क्रिकेट लिग महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते टॉस करुन उदघाटन झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक अमित गावडे , वसंत ग्रुपचे अनिल मित्तल , आयबीसीचेचे नितेश मकवाना , अभय खिवसंरा , दिलीप मॅथ्यू , कैलासजी पारेख आणी सर्व टिम सदस्य उपस्थित होते , यावेळी बोलताना महापौर म्हणाले की ही  आयबीसी प्रिमियर  क्रिकेट लिगच्या माध्यमातून कंपनीत काम करणा-या  कामगारांना खेळांची अत्यंत गरज असून खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते,
ही लिग दि.23 आणि 24 फेब्रुवारी दोन दिवस चालणार असून , त्यामध्ये एकूण ८ संघ  सहभागी असून, सर्व मॅच  8 ओव्हर होणार आहेत . या लिगचा बक्षीस समारंभ  दि. 24 फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.