शिंदखेडा – रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी एक दुचाकीस्वार आयशर पिकअपवर जावून धडकल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात अधिक वृत्त असे की, सुनिल विठ्ठल गुरव हा 30 वर्षीय तरूण त्याच्या (एम.एच.18 एक्स- 7924) क्रमांकाच्या सुझूकी गाडीने
किराणा मालाचा सामान घेवून आज सकाळी शिंदखेडा गावाहून चिमठाणेकडे जात असतांना हॅण्डलमध्ये पिशवी अडकल्याने तो पीकअप् व्हॅन गाडी क्र.(एम.एच.
18/6696) वर जावून धडकला. हा अपघात रेल्वे स्टेशनजवळ झाला असून या अपघातात सुनिल गुरव याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसात
माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.