Pathari biker dies after being run over by speeding Ashir एरंडोल : भरधाव आयशरच्या धडकेत पाथरीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडला. याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जागीच झाला मृत्यू
राजेंद्र सुरसिंग पाटील (50, पाथरी, जि.जळगाव) हे रविवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांची मोटरसायकल क्रमांक (एम एच 19, सीई 4942)ने म्हसावदकडून एरंडोलकडे जात असताना समोरून एरंडोलकडून म्हसावद कडे जाणार्या आयशर क्रमांक (एम.एच.19 झेड.5196) ने भरधाव वेगाने येवून दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत राजेंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
आयशर चालकाविरोधात गुन्हा
एरंडोल पोलिस ठाण्यात मयताचे शालक समाधान महादू पाटील (38, जवखेडा खुर्द, ता.एरंडोल) यांच्या फिर्यादीवरून आयशर ट्रक वरील चालक नईमुद्दीन कयामुद्दीन शेख (मुल्ला वाडा, एरंडोल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलो. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील करीत आहे.