शहादा । तालुक्यातील सावळदा फाटयाजवळ भरधाव वेगात येणार्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघ भावांपैकी एकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर दुसर्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भानुदास भबुता पाटील (61), असे मृताचे नाव आहे. ही घटना ही दुपारी अकरा वाजेचा सुमारास घडली आहे.
सातूरकेकडे जात असताना धडक
शहादा तालुक्यातील बामखेडा येथील भानुदास भबुता पाटील ( वय 54, हल्ली मुक्काम लोणखेडा) व शरद बभुता पाटील (वय 52) हे दोघे सकाळी 11 वाजेच्या सुमारास सातूरकेगावाकडे निघाले ते डिस्कव्हर मोटरसायकल (39 एल 2226) ने जात होते. शरद पाटील हे दुचाकी चालवत होते तर भानुदास पाटील हे मागे बसले होते. दोंडाईचा रस्त्यावरून अनरद बारीकडे जात असतांना आयशर (क्रमांक एम.एच.15 बी.7447) या गाडीने मागून धडक दिली. मोटारसायकलला सावळदा फाट्याचा अलीकडे कृष्णा पाइप फॅक्टरी समोर जोरदार धडक दिली. मोटारसायकल वरील दोघे पडल्याने भानुदास पाटील यांच्या डोक्याला मागील बाजुस् व हाताला जबर मार लागला तर शरद पाटील यांच्या कपाळावर मार लागला.
दुर्दैवी योग
भानुदास पाटील यांचे लोणखेडा येथे भोजनालय आहे. एक मुलगा व एक मुलगी आहे. पैकी मुलांचे दोन दिवसापुर्वीच विवाह संबंध जुडले आहेत. तर मुलीचा विवाह निश्चित करण्या साठी दोघे भाऊ शिंदखेडा तालुक्यातील सातूरके येथे निघाले होते. दोघांचे लग्न निश्चित झाल्यानंतर एप्रिल महिन्यात होणार्या गुजर समाज मंचचा सामूहिक विवाह सोहळ्यात हा विवाह निश्चित करणार होते. विवाहपुर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्याने बामखेडा त.त व मलोणी येथे शोकाकूल वातावरण पसरले आहे. या अपघाता संदर्भात मृताचा भाचा विपूल शरद पाटील शहादा पोलिसांत अज्ञात वाहनधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ईशी करीत आहे. ट्रक चालक गाडी सोडून फरार असून गाडी जप्त करण्यात आली आहे.
उपचारा दरम्यान मृत्यू
दोघाना शहरातील खाजगी रुग्णालयात नेले असता भानुदास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी शरद पाळील यांच्या कपाळावर टाके पडले आहेत. मृत भानुदास पाटील यांच्यावर शहादा पालिका रुग्णालयात शवविछेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, माकपचे मोहन शेवाळे, गिरधर पाटील घटनास्थळी पोहचले होते.