रावेर । आयसर गाडीने मोटरसायकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार व त्याची आई जखमी झाल्याची घटना कर्जोत गावा नजीक घडली आहे. याबाबत वृत्त असे की, दुपारच्या सुमारास आयसर गाडी क्रमांक (एमपी 68 एच 0177) हीने कर्जाद गावाचे पुढे अंबादास महाजन यांचे शेताच्या समोर रोडवर मोटरसायकला धडक देऊन पसार झाला आहे यात आसाराम राठोड व त्याची आई सरस्वती बाई रा. मेथखारी ता.जि. बुर्हाणपुर (एमपी) हे जखमी झाले आहे. याबाबत सूचना चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस करीत आहे.