नवी दिल्ली । आयसिसेसाठी आर्थिक रसद पुरवणे आणि तरुणांची भरती केल्याचे आरोप सिध्द झाल्यानंतर दिल्लीतील विशेष न्यायालयाने दोन जणांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अझहर अल इस्लाम आणि मोहम्मद फरहान शेख अशी या दोषी तरुणांची नावे असून यातील मोहम्मद फरहान शेख हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे.
पश्चातापाची विनवणी फेटाळली
दिल्लीतील विशेष न्यायालयाचे न्या. अमर नाथ यांनी ही शिक्षा सुनावली. या दोघांनीही वकीलामार्फत न्यायालयासमोर ‘आम्हाला आमच्या कृत्यांचा पश्चाताप असून आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आम्हाला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे असून आम्हाला समाजासाठी चांगले काम करायचे आहे’ असे अर्जात म्हटले होते. पण न्यायालयाने या दोघांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांच्यासोबत अदनान हसन या तरुणाला न्यायालयाने दोषी ठरवले.