आयसीडीसीतर्फे वैयक्तिक समुपदेशन कार्यशाळा

0

जळगाव। आयुष्यात सर्वोत्तम यश मिळवायचे असेल तर आजपासूनच अभ्यासाला सुरूवात करा. असे प्रतिपादन गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. दर्जी फाऊंडेशन आयोजित आयसीडीसी कार्यशाळेतील उपस्थित विद्यार्थी व पालकांसमोर ते बोलत होते. नुकतेच 10 वी व 12 वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी व पालकांना करिअरच्या बाबतीत योग्य माहिती मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य दर्जी फाऊंडेशनतर्फे निःशुल्क वैयक्तिक समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचे आवाहन
10 वी किंवा 12 वी नंतर शिक्षणाची अनेक मार्ग खुली होत असली तरी उच्चशिक्षणातून कायम स्वरुपी व शासकिय रोजगार मिळेलच याची शाश्‍वती नसते. म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर शासकिय रोजगार तर मिळतोच शिवाय सातत्यपूर्ण अभ्यासाने व कठोर मेहनतीने उच्च पदापर्यंत पोहचता येऊ शकते. परंतू पदवी नंतर अभ्यास करायचा विचार केला तर यशासाठी कालावधी जास्त लागण्याची शक्यता असते. म्हणूनच 10 वी किंवा 12 वी उत्तीर्णतेनंतर लगेचच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करायला हवी. आजच्या युवकांना सर्वोत्तम यश हवे असेल तर त्यांनी आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करायला हवी असे मत गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. दर्जी फाऊंडेशनतर्फे 10 वी व 12 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1 जुनपासून नवीन आय.सी.डी.सी. बॅच सुरु होणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या बॅचेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.