आयसीसीआयच्या निर्णयामुळे डु प्लेसिसला आश्‍चर्य

0

डुनेडिन । दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचे कर्णधार फाफ डु प्लेसिस ने बेगळुरू कसोटी सामन्याच्या वेळी डीआरएस च्या निर्णयावर कोणतीच कारवाई झाली नाही यावर आश्‍चार्य व्यक्त केले आहे. डु प्लेसिसला याचे आश्‍चार्या वाटते की या मुद्यावरून अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आईसीसी) आचार संहिताच्या उल्लघनावरून भारतीय कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचे कर्णधार स्टीव स्मिथ याच्यांवर कोणतीही दंडाची कारवाई केली नाही.

प्लेसि म्हणाला की मला आश्‍चार्य वाटत आहे की, या घटने नंतर कोणालाही दंड आकारण्यात आला नाही.आईसीसी कडून आलेली प्रतिक्रिया वेगळी होंती.दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधार म्हणाला की, आमचे व न्यूजीलंड संघात क्रिकेट खेळण्याचे पध्दत एकच आहे.आम्ही मैदानावर एक दुसर्‍याचा सन्मान करतो. पण भारत व ऑस्ट्रेलिया याच्या सारखे संघ खेळतात त्यावेळेस अशा गोष्टी होणे सहाजिक आहे. विशेष म्हणजे बेगळुरू कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसर्‍या पारीत स्मिथ हा उमेश यादव याच्या बॉलवर एलबीडब्ल्यु बाद झाले.मात्र सरळ पवेलियन जायचे की डीआरएस मागायचे यापेक्षा स्मिथ आणि हैड्सकॉम्ब हे संघाच्या ड्रेसिंग रूम के संकेत मागतांना दिसले. मैदानावर उपस्थित पंच निजेल लोग ने स्मिथला हे करण्यापासून थांबविले.याचवेळी विराट व स्मिथ काही तरी बोलाचाली झाली आणि ऑस्ट्रेलिया संघ 75 धावांनी पराभूत झाला.