नवी दिल्ली । क्रिकेट संघामध्ये बदल होत असून त्यापाठोपाठ क्रिडा संघटनामध्ये हि नियमावलीत बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घटनेत ही बदल होत आहे.त्या नवीन प्रस्ताविक घटना सदस्य देशांच्या स्वायत्ततेला धोकादायक ठरू शकते असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले आहे.याचबरोबर आयसीसीचे वित्तीय मॉडेलसुध्दा अमान्य आहे असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
संपूर्ण कार्यशैली बदलेल
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नवीन प्रस्ताविक घटना तयार करित आहे.त्यासाठी सर्व देशांचे म्हणणे मागविले होते. यावर आपले मत व्यक्त करतांना बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी आयसीसीचे मुख्य संचालन अधिकारी लेन हिंगीस यांना एक ईमेल केला असून, प्रस्तावित घटनेत काही बदल करण्याची मागणी केली आहे. आयसीसीच्या नव्या घटनेमुळे संपूर्ण कार्यशैली बदलेल. आयसीसीच्या घटनेतील बदल स्पष्ट नाहीत, असे बीसीसीआयने आयसीसीची घटनेच्या समीक्षेनंतर म्हटले.नवी प्रस्तावित घटना सदस्य देशांच्या स्वायत्ततेला धोकादायक ठरू शकते, आयसीसीचे वित्तीय मॉडेलसुद्धा आम्हाला अमान्य आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. वित्तीय मॉडेलवर येत्या एप्रिलमध्ये बैठक होणार आहे.आयसीसी चेअरमनचे अधिकार, सदस्यत्वासाठीचे नियम, मंडळाचे संचालक आणि नव्याने तयार करण्यात येत असलेल्या वित्तीय मॉडेलवर बीसीसीआयने आयसीसीला आपल्या सूचना दिल्या आहेत. आयसीसीच्या नव्या घटनेनंतर ही संस्था सदस्य देशांसोबत एक संघटन म्हणून काम करण्याऐवजी केंद्रीय संस्था म्हणून काम करेल, असेही जोहरी यांनी म्हटले.