मुंबई । भारत व कंगारू याच्यातील कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीमध्ये पाहिजे तशी करू शकला नाही. त्यामुळे विराट कोहलीची आयसीसीच्या क्रमवारीत पुन्हा घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विराटची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक ठरली. दोन्ही डावांमध्ये मिळून त्याच्या नावावर केवळ 40 धावा जमा झाल्या आहेत. त्यामुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याची तिसर्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली. विराटच्या खात्यात 847 गुण असून, पहिल्या स्थानावरच्या स्टीव्ह स्मिथच्या खात्यात 936 गुण आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने 869 गुणांसह चौथ्या स्थानावरून दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डनेडिन कसोटीत शतक ठोकले आहे.