आयसीसीच्या बदलांला भारताचा ऐकांगी विरोध

0

नवी दिल्ली । आयसीसी आपल्या बिग थ्री मॉडेल बदलाचे संकेतनुसार आयसीसी स्वत:च्या आर्थिक व प्रशासकीय चौकटीत बदल करण्याच्या तयारीत आहे. या आर्थिक मॉडेलमध्ये बदल केल्यास भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मिळणार सर्वाधिक महसूल घटणार आहे. दुबईमध्ये आयसीसीच्या झालेल्या बैठकीत बीसीसीआयने प्रस्तावित बदलांचा पूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता. या बदलाला भारता इतर देशांनी पाठिंबा दिला नाही त्यामुळे भारत एकाकी पडला. त्यामुळे आयसीसीच्या नव्या बदलांवर एप्रिलमध्ये होणार्‍या बोर्डाच्या बैठकीत शिक्कामोर्ताब होण्यार आहे.

महसुलात भारताला 20.3 टक्के इतका फायदा
आयसीसीच्या बिग थ्री च्या बदलाला 7 देशांतील सदस्यांनी समर्थन दिले आहे.त्यामुळे भारताचा विरोध हा एकाकी राहिला आहे.भारताला फक्त श्रीलंकेने पाठिंबा दिला आहे. झिम्बाब्वे या देशाने मतदानात सहभाग घेतला नाही, तर न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने बदल करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. भारतासोबत नेहमीच असणार्‍या बांगलादेशनंही या बदलांना समर्थन दिले आहे. आयसीसीच्या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व वरिष्ठ बँकर विक्रम लिमये करत होते. लिमये म्हणाले, आम्ही आयसीसीच्या हा बदलांना स्वीकारू शकत नाही. मला या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यावर मनोहर यांनी बर्‍याच महिन्यांपासून मी वाटत पाहत असल्याचे सांगितले. सध्याच्या मॉडेलनुसार आयसीसीच्या ग्लोबल महसुलात भारताला 20.3 टक्के इतका फायदा मिळतो. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना तो घटवून 8 टक्क्यांवर आणायचा आहे. मात्र त्याला बीसीसीआयचा विरोध आहे.